खरा शिक्षक दिन डोळे ठेवा तुमचे उघडे तुम्ही पणाला लावा ज्ञान आठावीस नोवेम्बर हाच खरा शिक्षक दिन! सनातन्यांच्या हातात होती धर्माची तलवार बहुजनांनो रहा अज्ञानी करीत होती वार सनातन्यांशी करून लढ़ाई दिला आम्हा शिक्षण! सुरवात घरातुन केली सावित्री शिक्षित झाली पहिल्या स्त्री शिक्षिकेला फ़ेकुन मारलय शेण! मारेकरी धाडले होते ठार करायला फुलेंना मारेकर्यना बोले महात्मा शिकवा तुमच्या मुलांना कल्याणाचे ऐकुणी शब्द मारेकरी अचंबित झाले होऊनिया अंगरक्षक गेले ज्योतिबाला शरण! नाही विरोध हा कुणाचा शोध आहे सत्याचा सत्यापुढ़े उधळुन जाईल आहे बंगला तो पत्त्याचा ईथ नाही तांब पित्तळ हे आसली आहे सोन! घर दार सोडल ज्यानं देण्या आम्हाला शिक्षण मंग त्याच्याच स्मृतिला आम्ही करतो वंदन मंग त्याच्याच नावान आम्ही करणार शिक्षक दिन कवि मनेष आपल्या गीतातुन हा जागवी स्वाभिमान! आठावीस नोवेम्बर हाच खरा शिक्षक दिन! मनेष खटावे सत्यशोधक विध्यार्थी संघटना
Author profile
Manesh Khatawe
मनेष गंगाराम खटावे,
संशोधक
अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्र, ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, परभणी .
मनेष कविता, कथा, शोधनिबंध, लेख, नाट्य इत्यादी लेखन करत असतात. मनेष हे सत्यशोधक विध्यार्थी संघटेचे कार्यकर्ते असुन एक जिज्ञासु संशोधक सुद्धा आहेत. सध्या “महाराष्ट्रातील घरेलु कामगार महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास” हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे.
Leave a Reply